लाडक्या बहिणींना मिळणार 3 हजार रुपये दिवाळी बोनस, मात्र हे आहेत निकष

सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना प्रसिद्धीच्या शिखरावर असून या योजनेबद्दल राज्यातील असंख्य महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना मिळणार 3 हजार रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी तसेच राज्यातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी ही कल्याणकारी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर होणार बोनस वितरीत

जवळ येऊन ठेपलेल्या भारतीय संस्कृतीतील सर्वात महत्वाच्या सणाच्या म्हणजेच दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने या महिलांसाठी खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की यंदाच्या दिवाळी सणानिमित्त लाडकी बहीण योजनेच्या लाडक्या बहिणींना मिळणार महिलांना 3 हजार रुपये दिवाळी बोनस. तसेच काही निवडक महिलांना अतिरिक्त अडीच हजार रुपये सुद्धा वितरीत केल्या जाणार आहेत. चला तर जाणून घेऊया या दिवाळी बोनस संदर्भात अधिक माहिती.

निवडक महिलांना मिळतील एकूण साडे पाच हजार रुपये

लाडक्या बहिणींना मिळणार 3 हजार रुपये दिवाळी बोनस कारण राज्य सरकारद्वारा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिवाळीसाठी दिवाळी बोनस हे खास गिफ्ट देण्याची घोषणा करून महिलांच्या आनंदात मोलाची भर घातली आहे. दिवाळी सणानिमित्त माझी लाडकी बहिण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिला म्हणजेच सर्व लाडक्या बहिणींना मिळणार 3 हजार रुपये दिवाळी बोनस. इथे नमूद करावयाची विशेष बाब म्हणजे ही रक्कम दर महिन्याला मिळणाऱ्या निधीतून नसून अतिरिक्त रक्कम असणार आहे.

काही निवडक महिलांना अडीच हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम सुद्धा दिल्या जाणार असून या काही निवडक महिलांना एकूण साडेपाच हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. लाडक्या बहिणींना मिळणार 3 हजार दिवाळी बोनस मात्र फक्त ज्या लाडक्या बहिणी माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत अशा सर्व महिलांनाच हे दिवाळी बोनस मिळणार आहे.

लाडक्या बहिणींना मिळणार 3 हजार रुपये दिवाळी बोनस, मात्र हे आहेत निकष

दिवाळी बोनस लाभासाठी असलेले निकष

1) सदर महिलेचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असणे आवश्यक आहे.

2) ज्या महिलांनी या योजनेच्या माध्यमातून किमान तीन महिन्यांचा लाभ घेतलेला असणे अनिवार्य आहे.

3) लाडक्या बहिणींना मिळणार 3 हजार रुपये दिवाळी बोनस मात्र त्यासाठी सदर महिलांचे बँक खाते आधार सोबत सीडेड असणे गरजेचे असेल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे?

जुलै महिन्यात राज्य सरकार कडून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मुली व महिलांना दरमहा दीड हजार रूपये एवढी रक्कम दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. राज्यातील महिला आणि मुलींच्या सुदृढ आरोग्य आणि पोषण तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा उदात्त हेतू समोर ठेवून या कल्याणकारी योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

राज्यातील बऱ्याच महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत. अशा महिलांना दैनंदिन जीवन जगत असताना पैशांच्या अभावी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसेच या महिलांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी याशिवाय परिवारातील त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे.

बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वीच मिळणार 5 हजार रुपये दिवाळी बोनस, असे करा चेक

योजनेसाठी अर्ज करायची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभासाठी ज्या महिलांनी अद्यापही अर्ज सादर केलेले नाहीत त्यांच्यासाठी एक आनंददायी बातमी आहे. या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत तिसऱ्यांदा वाढविण्यात आली असून आता 15 ऑक्टोबर 2024 ही माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ज्या महिलांचा अजूनही अर्ज करायचा बाकी असेल अशा महिलांनी ऑफलाईन पद्धतीने तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्रे सादर करून अर्ज सादर करायचा आहे.

लाडक्या बहिणींना मिळणार 3 हजार रुपये दिवाळी बोनस. या दिवाळी बोनस मिळणाऱ्या लाडक्या बहिणींमध्ये जरी सध्या तुमचा समावेश होणार नसला तरीही दर महिन्याला दीड हजार रुपयांची मदत तुम्हाला या कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून नक्कीच होणार आहे. परिणामी शेवटची तारीख निघून जाण्याच्या आधीच तुम्ही अर्ज सादर करून माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यावा.

अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी

1) अर्जदार महिलेचे आधार कार्ड

2) महिलेचे अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 15 वर्ष आधीचे मतदान कार्ड किंवा पंधरा वर्षे अशीच राशन कार्ड

3) अर्जदार महिलेचे बँक खाते

4) राशन कार्ड

5) अर्जदार महिलेचे हमीपत्र

वरील सर्व कागदपत्रे सादर करून आपण माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरू शकतात. सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना मिळणार 3 हजार रुपये दिवाळी बोनस ही बाब राज्यातील असंख्य महिलांना सुखावणारी आहे हे मात्र नक्की.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment