गावात राहणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ग्रामपंचायत मधून मिळणारी कागदपत्रे काढताना बहुतांश वेळा बराच वेळ खर्च होतो. आता मात्र आता घरबसल्या ग्रामपंचायतीची कागदपत्रे एका क्लिकवर मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य सरकारने ” महा ई ग्राम” (mahaegram) ॲप सुरू केले असून आता आपल्याला लागणारी विविध कागदपत्रे उदा. आठ अ, ना हरकत प्रमाणपत्र, वारसाचा दाखला, जन्म मृत्यू प्रमाणपत्र इत्यादी महत्वाचे कागदपत्रं अगदी एका क्लिक वर मिळणे शक्य होणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग आले जवळ
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे दिवसेंदिवस लोकांच्या आयुष्यात सोयी सुविधा वाढत आहेत. संपूर्ण जग इतके जवळ आले आहे की इंटरनेटच्या माध्यमातून कुठलीही जगातील कुठल्याही कोपऱ्यात व्हिडिओ कॉल पासून ते लाखो रुपयांचा घरबसल्या जॉब हे सर्व मिळणे अगदी सहजशक्य झाले आहे. केंद्र सरकारच्या वतीने सुद्धा ऑनलाईन कागदपत्रे मिळण्यासाठी महा ऑनलाईन नावाचे ॲप आणि संकेतस्थळ आधीच उपलब्ध करून दिले आहे. आता आता ग्रामीण भागातील लोकांसाठी सुद्धा “महा ई ग्राम” (mahaegram) ॲपच्या माध्यमातून घरबसल्या ग्रामपंचायतीची कागदपत्रे एका क्लिकवर मिळणे शक्य होणार असल्यामुळे लोकांचा वेळ वाचेल यात शंका नाही.
“महा ई ग्राम” ॲप मुळे वेळेची होणार बचत
गावकऱ्यांचा ग्राम पंचायतीशी थेट संबंध येतो. कारण त्यांना विविध प्रमाणपत्रासाठी ग्राम पंचायत मध्ये येणे भाग असते ग्रामस्थांना लागणारे दाखले मिळविण्यासाठी त्यांना ग्रामपंचायतीमध्ये चकरा माराव्या लागतात. आपल्याला पाहिजे असलेल्या दाखल्यासाठी अर्ज करावा लागतो. त्यांनतर ग्रामपंचायत प्रशासन अर्जावर प्रक्रिया करून त्यांना पाहिजे असलेला दाखला ग्रामस्थांना देते. परंतु ही प्रक्रिया वेळ खाऊ असल्यामुळे शासनाच्या ग्रामविकास विभाग आणि पंचायतराज विभागामार्फत महा ई ग्राम (mahaegram) सिटिझन कनेक्ट नावाने एक नवीन ॲप सुरू करण्यात आले आहे.
या ॲप व्दारे आपल्या मोबाइलवर ग्राम पंचायत मधील सर्व दाखले घरबसल्या मिळत आहेत. यासाठी आता “ई ग्राम ॲप (mahaegram) डाउनलोड करून घरबसल्या आवश्यक ते प्रमाणपत्र प्राप्त केल्या जाणार आहेत. ग्रामपंचायतीत चकरा मारणे टाळायचे असल्यास झटपट ‘महा ई ग्राम’ अॅप डाउनलोड करणे आवश्यक आहे. विविध जिल्ह्यातील ग्रामपंचायत अंतर्गत हे “महा ई ग्राम” सिटिझन कनेक्ट ॲप डाउनलोड केल्या जात आहेत.
ॲप डाऊनलोड कसे करायचे?
“महा ई ग्राम” (mahaegram) सिटिजन ॲप आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जायचे आहे. “महा ई- ग्राम (mahaegram) सिटिझन कनेक्ट अशाप्रकारे सर्च बॉक्स मध्ये सर्च करायचे आहे. त्यानंतर आपल्याला महा ई ग्राम ॲप आपल्या मोबाइलवर डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केलं की महा ई ग्राम (mahaegram) ॲप तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड होणार आहे. त्यानंतर आपला मोबाइल नंबर टाकून सदर ॲप वर नोंदणी करायची आहे.
नोंदणी करण्यासाठी तुम्हाला स्वतःची माहिती भरावी लागेल. एकदा का नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली की महा ई ग्राम (mahaegram) ॲप सुरू होते. नंतर तुम्हाला हवा तो दाखला तुम्ही या ॲपच्या माध्यमातून घरबसल्या प्राप्त करू शकता. हे ॲप पुर्णपणे निःशुल्क आहे.
महा ई ग्राम ॲपद्वारे कोणते दाखले मिळतील?
महा ई ग्राम (mahaegram)सिटिझन कनेक्ट मोबाईल ॲप हे घरबसल्या नागरिक सेवा मिळविण्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना जन्म, मृत्यू, विवाह, नमुना ८ (मूल्यांकन), बीपीएल इत्यादी घरबसल्या प्रमाणपत्र प्राप्त होणे सहजशक्य होणार आहे. याशिवाय नेट बैंकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय आणि क्यूआर कोड स्कॅनिंग पद्धितीचा वापर करून नागरिक घरपट्टी, पाणी कर ऑनलाइन भरू शकतात.
महा ई ग्राम (mahaegram)ॲपचे फायदे
जनतेचा त्रास कमी होऊन त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी महाराष्ट्र शासन ऑनलाइन पद्धतीचा वापर करून महा ई-ग्राम (mahaegram) सिटिजन कनेक्ट ॲप लॉन्च करण्यात आले आहे.
या ॲपद्वारे आता नागरिक घरबसल्या ग्रामपंचायतीचे सर्व प्रमाणपत्र त्यांच्या मोबाइलद्वारे मिळवू शकतील.
याचबरोबर आपल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये असलेली कार्यकारिणी किंवा अधिकारी वर्ग यांची सविस्तर माहितीसुद्धा या ॲपवर सहजरित्या बघता येणार आहे. तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्यात माहिती भरता येणार आहे. खेड्या पाड्यातील बऱ्याच ग्रामपंचायत मध्ये बऱ्याच वेळा ग्रामसेवक हजर नाहीत, सरपंच हजर नाहीत म्हणून कागदपत्रे काढण्यासाठी लोकांना चप्पल झिजवावी लागते, हे सत्य परिस्थिती आहे.
कधी कधी सरपंच आणि ग्रामसेवक नागरिकांना त्यांचा थकीत कर भरणा केल्याशिवाय कागदपत्रे मिळणार नाहीत अस बंधन देऊन एकप्रकारे नागरिकांना ओलीस धरतात. बऱ्याच वेळा गरीब जनतेकडे भरायला पैसे नसतात. परिणामी इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारी ग्राम पंचायतीची कागदपत्रे मिळत नसल्यामुळे ते सदर योजनांपासून वंचित राहतात. आता ई ग्राम (mahaegram) ॲप मुळे हा अनुचित प्रकार कमी होण्यास मदत होईल हे मात्र नक्की. महा ई ग्राम (mahaegram) ॲप आतापर्यंत १मिलियन पेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केले असून सदर आपला 2.4 इतकी संमिश्र रेटिंग देण्यात आली आहे.तसेच एकूण २७४ नागरिकांनी महा ई ग्राम ॲप बद्दल त्यांचे रिव्ह्यू दिलेले आहेत.