गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना २०२४, संपुर्ण माहिती

शेतकऱ्यांना शेतात काम करत असताना खूप घाम तर गाळावा लागतोच त्याशिवाय आयुष्यात अनेक संकटांना समोर जावे लागते. शेती व्यवसाय करताना अनेक अपघात होत असतात. उदा. अंगावर वीज पडणे, पूरात बुडून मृत्यू, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का लागणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावर होणारे अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात या सर्व बिकट परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू होतो अन् काहीजणांना कायमचं अपंगत्व येते. घरातील कर्त्या पुरुषाला झालेल्या अपघातामुळे त्या परिवाराचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अतिशय बिकट परिस्थिती निर्माण होते.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचे उद्दिष्ट

म्हणूनच अशा अपघाग्रस्त शेतकऱ्यांना, त्यांच्या परिवाराला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतकऱ्यांची पती, पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वर्ष वयोगटातील एकूण २ जणांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, संपुर्ण माहिती

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेचे स्वरुप काय आहे?

राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात रस्ता / रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू जंतूनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे / चावण्यामुळे जखमी / मृत्यू, दंगल, अन्य कोणतेही अपघात
तसेच अपघाताच्या व्याख्येनूसार कोणत्याही अनपेक्षित आकस्मिक दुर्दैवी अपघातामुळे होणारे मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास सदर योजनेतून अपघातग्रस्त शेतकरी / शेतक-याच्या वारसदारास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतून लाभ देण्यात येईल.


गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेची व्याप्ती व लाभार्थी पात्रता विषयी माहिती

कृषी गणनेनुसार निर्धारीत केलेल्या सर्व वहितीधारक खातेदार असलेले शेतकरी व वहितीधारक
खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही १ सदस्य (आई-वडील शेतकऱ्याची पती / पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वयोगटातील एकूण २ जणांचा समावेश असेल.

👉 हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना कार्यान्वित, शेतकऱ्यांना मिळणार 5 वर्ष वीज मोफत


गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेअंतर्गत अपघात होणाऱ्या शेतकऱ्याचा वारसदार कोण असेल?

१) अपघातग्रस्ताची पत्नी / अपघातग्रस्त स्त्रीचा पती
(२) अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी ३) अपघातग्रस्ताची आई ४ )
अपघातग्रस्ताचा मुलगा ५) अपघातग्रस्ताचे वडील ६ ) अपघातग्रस्ताची
सून ७) अन्य कायदेशीर वारसदार

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या बाबी

१) रस्ता / रेल्वे अपघात २) पाण्यात बुडून मृत्यू ३) जंतूनाशके ताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा ४) विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात. ५) वीज पडून मृत्यू ६) खून ७) उंचावरून पडून झालेला अपघात ८) सर्पदंश व विंचूदंश ९) नक्षलवाद्यांकडून झालेल्या मृत्यू किंवा अपघातसाठी१०) जनावरांच्या खाल्ल्यामुळे / चावण्यामुळे जखमी / मृत्यू ११ ) दंगल मध्ये झालेला मृत्यू किंवा अपघात १२) बाळंतपणातील मृत्यू १३) अन्य कोणतेही अपघात.


गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेमध्ये समाविष्ट नसणाऱ्या बाबी कोणत्या आहेत?

१) नैसर्गिक मृत्यू २) विमा कालावधीपुर्वीचे अपंगत्व ३) आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करुन घेणे ४ )गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात ५ ) अंमली पदार्थाच्या अमलाखाली असताना झालेला अपघात ६) भ्रमिष्टपणा
७) शरीरांतर्गत रक्तस्त्राव ८) मोटार शर्यतीतील अपघात ९) युध्द १० ) नोकरी ११) जवळच्या लाभधारकाकडून झालेला खून.


सदर योजना विहित कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या २४ तासांसाठी लागू राहील. वहितीधारक खातेदार असलेले शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही १ सदस्य यापैकी कोणत्याही व्यक्तिला केव्हाही अपघात झाला किंवा अपंगत्व आले
तरीही ते या योजनेंतर्गत लाभासाठी पात्र राहतील. सदर योजनेंतर्गत लाभास पात्र असणाऱ्या शेतकऱ्याने / शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य
विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतंर्गत देय लाभास पात्र ठरणार नाहीत.


गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतंर्गत लाभ प्राप्त होणेसाठी अर्जासोबत खालील सामान्य कागदपत्रे सादर करावी.

१) ७/१२ उतारा २) मृत्यूचा दाखला
३) शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गांव नमुना नं. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद.
(४) शेतक-याच्या वयाच्या पडताळणीकरिता शाळा सोडल्याचा दाखला / आधारकार्ड / निवडणूक ओळखपत्र ज्या कागदपत्राआधारे ओळख / वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्रे.
५) प्रथम माहिती अहवाल / स्थळ पंचनामा / पोलीस पाटील अहवाल.
६ ) अपघाताच्या स्वरुपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघात विषयक आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?

रस्ता तसेच रेल्वे अपघातात मृत्यु झाला असल्यास इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, विमा संरक्षित व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास त्याचा मोटार वाहन परवाना.

पाण्यात बुडून मृत्यु झाला असल्यास इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, बुडून बेपत्ता झाल्यास फक्त प्रथम माहिती अहवाल व क्षतीपूर्ती बंधपत्र आवश्यक.

जनावरांच्या चावण्यामुळे मृत्यु झाला असल्यास इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, रासायनिक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल ).

विषारी पदार्थांच्या अनावधाणी विषबाधेमुळे मृत्यु झाला असल्यास इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, रासायनीक विश्लेषण अहवाल (व्हिसेराअहवाल), इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, पोलिस अंतिम अहवाल.

इतर कुठल्याही अनैसर्गिक कारणाने मृत्यु झाला असल्यास इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, वैद्यकीय उपचारा पुर्वीच निधन झाल्याने पोस्ट मॉर्टेम झाले नसल्यास या अहवालातून सूट मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिकाऱ्याकडून प्रतिस्वाक्षरीत असणे आवश्यक आहे.

नक्षलवादी हल्ल्यात इजा किंवा मृत्यू झाला असल्यास नक्षलवादी हत्येसंदर्भातील कार्यालयीन कागदपत्र,मृत्यू औषधोपचाराची कागदपत्रे, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र

दंगलीत मृत्यु किंवा क्षती झाली असल्यास इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम, क्षतीपूर्ती बंधपत्र आवश्यक तसेच इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, दंगली बाबतची कार्यालयीन कागदपत्रे.

बाळंतपणात मृत्यू झाला असल्यास त्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र शासकीआरोग्य केंद्र अधिका-याकडून प्रतिस्वाक्षरीत केलेले असणे आवश्यक आहे. तसेच इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, पोलिस अंतिम अहवाल.

अपघाती अपंगत्व आले असल्यास अपंगत्व अथवा अवयव निकामी होण्याचे कारणाबाबचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र अथवा दवाखान्याच्या नोंदी २) प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र / जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिस्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र

महत्वाची टिप : १) वरील कागदपत्र मुळ किंवा राजपत्रित अधिकारी यांनी सांक्षाकीत केलेले अथवा स्वयंसाक्षांकीत असल्यास ग्राह धरण्यात येईल. २) मृत्यू कारणाची नोंद सक्षम प्राधिकाऱ्याने स्पष्ट केली असल्यास रासायनिक विश्लेषण अहवाल ( व्हिसेरा अहवाल ) या कागदपत्रांची आवश्यकता राहणार नाही.


विमा प्रस्ताव सादर / मंजूर करण्याबाबत पध्दती

१) जेव्हा शेतकऱ्यांचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी / शेतकऱ्यांचे वारसदार यांनी सर्व निर्धारीत कागदपत्रांसह परिपूर्ण विमा प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी यांचेकडे ३० दिवसांच्या आत सादर करावा.
२) अपघातग्रस्त शेतकऱ्याबाबत प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यावर सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या पथकाने प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करून त्याबाबतचा अहवाल तहसिलदार यांना घटना घडल्यापासून ८
दिवसांच्या आत सादर करावा.
३) तालुका कृषी अधिकारी यांनी प्राप्त झालेल्या विमा प्रस्तावांची छाननी करुन पात्र विमा प्रस्ताव संबंधित तहसिलदार यांचेकडे सादर करावा.


४) तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीमध्ये ३० दिवसाच्या आत संबंधित शेतकरी / शेतकरी कुटुंबाच्या वारसदारांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल व यानंतर संबंधित तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत अपघातग्रस्त शेतकरी / वारसदारांच्या बँक खात्यात ECS द्वारे निधी अदा करण्यात येईल.५) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत वारसदारांची निवड पुढीलप्रमाणे करण्यात येईल.
१) अपघातग्रस्ताची पत्नी / अपघातग्रस्त स्त्रीचा पती २ ) अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी ३) अपघातग्रस्ताची आई ४)अपघातग्रस्ताचा मुलगा ५) अपघातग्रस्ताचे वडील ६ ) अपघातग्रस्ताची
सून ७) अन्य कायदेशीर वारसदार


गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना कार्यान्वयीन यंत्रणा :

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत शेतकरी / शेतकऱ्याचे वारसदार यांना तातडीने मदत मिळण्यासाठी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अपिलिय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.

या योजनेच्या माध्यमातून किती रक्कम लाभार्थ्यास मिळते याबद्दल माहिती जाणून घेऊया.

शेतात काम करताना सदर शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास अशा शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना
2,00,000/- रुपये सरकारकडून या योजनेच्या माध्यमातून दिले जातात. ज्या नागरिकांना झालेल्या अपघातामुळे त्यांचे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास एकूण 2,00,000/- रू. मिळतात तसेच ज्या लोकांचा अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाला 2,00,000/- रुपयांची रक्कम लाभार्थ्यास देण्यात येते. आणि अपघातामुळे ज्या नागरिकाचा एक डोळा किंवा एक अवयव निकामी जर झाला तर अशा शेतकऱ्यास एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी सरकार तत्पर आहे.

लाभ मिळवण्यासाठी अर्ज कुणाकडे करावा लागेल?

या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना अपघाती मृत्यू अथवा अपंगत्व आले असल्यास त्यांना एक महिन्याच्या आत अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. परिवारातील सदस्यांनी त्याबाबतचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे. यात केवळ एका साध्या कागदावर अपघाताविषयीची सविस्तर माहिती लिहावी लागेल आणि त्यात सविस्तरपणे अपघात झाल्याचे कारण सांगून ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येईल. या अर्जात आधी स्वत: बद्दलची माहिती लिहून मग मयताचं नाव, त्यांच्यासोबतचं नाव, मृत व्यक्तीच्या मृत्यूचे कारण, तसेच मृत्यू झाल्याचा दिनांक लिहायचा असतो. नंतर संबंधीत अधिकारी पडताळणी करतात आणि या योजनेच्या सर्व नियमांत तसेच अटित बसणाऱ्या अर्जदारांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.

या योजनेअंतर्गत सन 2024- 25 साठी 30 कोटी वाटपास मंजुरी

राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्त्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये राबविण्यात येत असते. यासंबंधी एक शासन निर्णय काढून या योजनेअंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षातील मंजूर प्रस्ताव निकाली काढण्यासाठी चालू आर्थिक वर्षामध्ये केलेल्या तरतुदी मधून 30 कोटी रुपये इतके अनुदान वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यात 123 शेतकऱ्यांना मिळाला लाभ

२०२३ – २४ या आर्थिक वर्षात जालना जिल्ह्यातील १२३ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांचा अर्ज मंजूर होऊन त्यांच्या वारसांना २ कोटी ४६ लाख रुपये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या अंतर्गत निधी वितरीत करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील १२३ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख प्रमाणे २ कोटी ४६ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आल्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले आहे.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment