गणेश चतुर्थी(Ganesh chaturthi) शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्व

गणेश चतुर्थी(Ganesh chaturthi) सणाला भारतीय समाजात खूप सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. भारतातील तसेच जगभरातील लोक भगवान गणेशाची पूजा करण्यासाठी, यशासाठी आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आतुरतेने गणपती बाप्पाची वाट पाहत असतात. असे म्हटले जाते, ”जे लोक गणेशाची पूजा अर्चना करतात, ते त्यांच्या मनोकामना आणि इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत. गणरायाची संपूर्ण श्रध्देने पूजा अर्चना करणाऱ्या भक्तांची इच्छा पूर्ण होते आणि जे लोक गणपती बाप्पाची प्रार्थना करतात, त्यांची पापांतून मुक्तता होते, अशी प्रत्येक भक्ताचा निस्सीम विश्वास असतो. ज्या गणपती बाप्पाच्या आगमनाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तो पवित्र क्षण जवळ आला आहे. गणेश चतुर्थी (Ganesh chaturthi) उत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत आहे.

Lord Ganesha Statue Ganesh chaturthi 2024

गणेश चतुर्थी (Ganesh chaturthi) चा इतिहास

गणेश चतुर्थी (Ganesh chaturthi) हा भारतीय हिंदू लोकांसाठी तसेच जगभरातील अनेक लोकांसाठी अतिशय पवित्र उत्सव असून अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून गणेशोत्सव ऐतिहासिकदृष्ट्या साजरा केला जात असल्याचे इतिहासात दाखले मिळतात. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तेव्हापासून गणेश चतुर्थी (Ganesh chaturthi) संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी होते. लोकमान्य टिळकांनी तत्कालीन विपरीत परिस्थितीत इंग्रजांशी लढण्यासाठी देशाचे लोक एकत्र आले पाहिजे यासाठी गणेशोत्सव साजरा करण्याचा यशस्वी पायंडा पाडला जो आजही अविरत सुरू आहे. त्याकाळी गणेश चतुर्थी (Ganesh chaturthi) सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केल्यामुळे समाजातील सर्व जातींच्या लोकांमध्ये एकता निर्माण होऊन इंग्रजांविरुध्द लढायला मदत झाली होती.

गणेश चतुर्थी २०२४ शुभ मुहूर्त (Ganesh Chaturthi Muhurat) अचूक वेळ

पंचागानुसार यावर्षी ७ सप्टेंबर या दिवशी गणेश चतुर्थी Ganesh chaturthi) च्या पूजेचा शुभ मुहूर्त दोन तास ३१ मिनिटे असणार आहे. गणेश चतुर्थी २०२४ रोजी सकाळी ११ वाजून ०३ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ३४ मिनिटांपर्यंत श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करीत पूजा अर्चना करण्यास पवित्र वेळ मानली गेली आहे.

गणेश चतुर्थी (Ganesh chaturthi) उत्सव साजरा करण्यामागील ऐतिहासिक महत्व

गणेश चतुर्थी (Ganesh chaturthi) संबंधी एक पौराणिक कथा आहे. या कथेनुसार भगवान गणेश भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र असल्याचे मानले जाते. गणेश चतुर्थी हा दिवस गणपतीच्या जन्माचा उत्सव आहे. त्यामागील गोष्ट तुम्ही निश्चितच ऐकलेली असेल. पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात असताना आपल्या अंगावरील मळापासून एका लहानशा मुलाची मूर्ती तयार करते आणि त्यात प्राण ओततर. या लहान मुलाला देवी पार्वती आपले स्नान होईपर्यंत आपल्या कक्षाबाहेर पहारा देण्यास सांगतात आणि कोणालाही आत प्रवेश न देण्याची सूचना बाल गणेशला त्याप्रमाणे गणेश आपल्या मातेच्या आज्ञेचे पालन करतो आणि कक्षाबाहेर पहारा देत बसतो.

त्याच वेळी देवी पार्वतीचे पती महादेव त्यांना भेटण्यासाठी तिथे येतात. त्या क्षणी गणेश आणि महादेव दोघेही एकमेकांना ओळखत नसतात. गणेश आपला पुत्र आहे हे भगवान शंकर यांना माहीत नसते आणि भगवान शंकरच आपले पिता आहेत हे बाल गणेशला माहीत नसते. त्यामुळे तो लहान मुलगा महादेवांना माता पार्वतीच्या कक्षात प्रवेश करण्यापासून रोखतो. महादेव सुद्धा ते मान्य करत नाही आणि हा लहान मुलगादेखील मागे हटत नाही. भगवान शंकरांना राग अनावर होतो.

दोघांमधील वाद टोकाला जातो आणि शंकर आपल्या त्रिशूळाने त्या मुलाचे शिर धडापासून वेगळे करतात. तोपर्यंत माता पार्वती स्नान आटोपून बाहेर येतात तेव्हा आपल्या मुलाची अशी स्थिती पाहून अत्यंत त्यांना अत्यंत दुःख होते. आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा भगवान शंकराकडे त्या हट्ट धरतात. तेव्हा महादेव त्यांच्या देवतांना उत्तर दिशेला सर्वांत पहिल्यांदा जो प्राणी दिसेल त्याचे डोके आणण्यास सांगतात. देवता प्राण्याच्या शोधार्थ निघतात शेवटी त्यांना हत्तीचे डोके मिळते. अखेर महादेव ते हत्तीचे डोके त्या लहान मुलाच्या धडाला जोडतात आणि श्रीगणेश पुन्हा जिवंत होतात, अशाप्रकारची पौराणिक कथा आहे.

गणेश चतुर्थी (Ganesh chaturthi) कशी साजरी केली जाते?

गणेशोत्सवाच्या प्रारंभी घरात सुंदर सजावट करून गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. उपासना करण्याच्या एकूण १६ पद्धती आहेत. मूर्तीला लाल चंदन लावले जाते आणि पिवळ्या व लाल फुलांनी सजवले जाते. गणरायाला जास्वंदाचे फूल आणि दूर्वा अत्यंत प्रिय आहेत, त्या अर्पण केल्या जातात. तसेच गणेश उपनिषद आणि इतर वैदिक स्तोत्रांचा उच्चार केला जातो.

गणपती बाप्पाच्या आगमनानंतर त्यांना नारळ, गूळ आणि २१ मोदकांचा नैवेद्य सादर केला जातो. मोदक हा गणपती बाप्पाचा अत्यंत आवडता पदार्थ मानला जातो. उत्सवाच्या उत्तरार्धात ढोल वाजवून, नृत्यासह मोठ्या भक्तिभावाने संपूर्ण देशभर गणेश मूर्तींच्या मोठमोठ्या मिरवणुका जातात. नंतर जवळच्या नदीकडे घेऊन जाऊन पवित्र विधीचा एक भाग म्हणून गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. गणेश आपले आई-वडील म्हणजेच भगवान शिव आणि पार्वतीचे घर असलेल्या कैलास पर्वतावर परत जातात, असे मानले जाते. भक्त भाविक अत्यंत आदराने आणि श्रध्देने पुढच्या वर्षी लवकर या असा आग्रह करून बाप्पाला निरोप देतात.

गणेश चतुर्थी (Ganesh chaturthi) चे धार्मिक महत्त्व

पौराणिक मान्यतेनुसार, ज्या दिवशी महादेव शंकर आणि माता पार्वतीचा मुलगा गणेश यांचा जन्म झाला, तो पवित्र दिन म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी होती. म्हणून या दिवसाला गणेश चतुर्थी तसेच विनायक चतुर्थी या नावाने ओळखले जाते. श्रीगणेशाच्या पूजेमुळे घरात सुख, समृद्धी आणि भरभराट होते, अशी भाविकांची दृढ श्रद्धा असते. कोणत्याही शुभकार्यात विघ्न येऊ नये म्हणून विघ्नहर्ता गणरायाची निस्सीम भक्ती केली जाते. गणेशोत्सव दरम्यानच्या कालावधीत वातावरण खूपच आल्हादायक आणि भक्तिमय होऊन जाते.

जगातील सर्वात महागडी गणेश मूर्ती

सोन्या चांदीच्या गणेश मूर्ती आपण नेहमीच पाहत असतो. सोन्या चांदी पेक्षा अधिक मौल्यवान अशा दुर्मिळ धातूची गणेश मूर्ती सुरत मधील एका व्यापाऱ्याकडे आहे. 2.4 सेमी आकाराची गणेशाची मूर्ती आहे. या मूर्तीची किंमत तब्बल 600 कोटी रुपये आहे. ही जगातील सर्वात महागडी मूर्ती आहे. गुजरातमधील सुरत येथे राहणारे व्यापारी राजेश भाई पांडव यांच्याकडे जगातील सर्वात महागडी गणेश मूर्ती आहे. दक्षिण आफ्रिकेत एका लिलाव दरम्यान गुजरात मधील व्यापारी राजेश भाई यांनी गणेश मूर्तीप्रमाणे आकार असलेला हा हिरा खरेदी केला. अगदी गणेश मुर्तीसारखा दिसणारा हा हिरा जगातील सर्वोत्तम हिऱ्यांपैकी एक आहे. यामुळेच सोनं चादींपेक्षा ते अधिक मौल्यवान आहे.

मोदक गणरायांना आवडता पदार्थ कसा बनला? रोचक पौराणिक कथा (Ganesh chaturthi)

याविषयी पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान शंकर झोपलेले असताना गणपती बाप्पा दरवाजावर पहारा देत होते. परशुराम तिथे पोहोचल्यावर गणेशजींनी त्यांना दारात थांबवले. त्यामुळे परशुराम रागावले आणि गणेशसोबत भांडण करू लागले. याचे रूपांतर द्वंद्वात झाले. या युद्धात परशुरामाने भगवान शंकराने दिलेल्या हळदाने गणपती बाप्पावर आघात केला. त्यामुळे गणरायांचा एक दात तुटला होता.

युद्धाच्या दरम्यान तुटलेल्या या दातामुळे गणेशाला अन्न चावून खाण्यास त्रास होऊ लागला. बाप्पाची अशी अवस्था पाहून माता पार्वतीने त्यांच्यासाठी मोदक तयार बनवले. मोदक खूप मऊ असतात आणि त्यांना दातांनी चावण्याची गरज नसते. परिणामी गणरायांना पोटभर मोदक खाल्ले. तेव्हापासून मोदक हा श्रीगणेशाचे आवडता पदार्थ बनला.

गणरायांना दुर्वा समर्पित करण्यामागील पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळात अनलासुर नावाचा एक राक्षस स्वर्ग आणि पृथ्वीवरील सर्व लोक देवदेवता तसेच लोकांना त्रास देत होता. स्वभावाने अतिशय कठोर असलेला हा दैत्य ऋषी-मुनींसह सामान्य लोकांनाही जिवंत गिळत असे. या दैत्यामुळे त्रस्त झालेले इंद्रादेव तसेच देवलोकातील सर्व देवी-देवता आणि ऋषी-मुनी महादेवाकडे महादेवाकडे प्रार्थना घेऊन पोहोचले. महादेवांनी या असुराचा वध करावा अशी त्यांना याचना केली. तेव्हा भगवान शंकरांनी सर्व देवी-देवता आणि ऋषी-मुनींची प्रार्थना ऐकून सांगितलं की अनलासूराचा अंत फक्त गणरायाचं करु शकतील.

नंतर गणपती बाप्पाच्या कानावर ही गोष्ट गेली. जगत कल्याणासाठी गणपती बाप्पाने ज्यावेळी अनलासुराला गिळंकृत केलं तेव्हा त्यांच्या पोटात जळजळ होऊ लागली. विविध उपाय करून झाले मात्र श्रीगणेशाच्या पोटातील जळजळ काही केल्या थांबेना. तेव्हा महर्षी कश्यप ऋषी यांना एक युक्ती सुचली. त्यांनी दुर्वाच्या 21 गाठी बांधल्या आणि श्रीगणेशाला खाऊ घातल्या. जेव्हा गणेशजी यांनी दुर्वा खाल्ली तेव्हा त्यांच्या पोटातील जळजळ शांत होऊन आराम मिळाला. तेव्हापासून गणपतीला दुर्वा अर्पित करण्याची परंपरा सुरु झाली. गणेश चतुर्थी(Ganesh chaturthi) पूजेत याचं मोठं महत्त्व आहे.

गणेश विसर्जन २०२४ तारीख

गणेशोत्सव १० दिवस असतो. काहीजण आपल्या परंपरेनुसार १, दीड, ३, ५, ७ दिवसाचा गणपती आस्थापना करतात. परंतू १० दिवसांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशोत्सवाची सांगता करण्यात येते. या दिवसाला गणेश विसर्जन असेही म्हणतात. यावर्षी गणेश विसर्जन १७ सप्टेंबर २०२४ रोजी असून या दिवसाचा वार मंगळवार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्व भक्त भाविक गणपती बाप्पाला अत्यंत उत्साहाने निरोप देतात आणि पुढच्या वर्षी लवकर या असा हक्काचा आर्जव करतात. भव्य मिरवणूक काढून तलाव किंवा नदीमध्ये गणपतीची मूर्ती विसर्जित करण्याची आपल्याकडे परंपरा आहे.

गणपती बाप्पांची आरती

गणपती आरती 1

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥०१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥०२॥

लंबोदर पितांबर फनी वरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥०३॥

गणपती आरती 2

नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें।
लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें।
ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे।
अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें।। 1 ।।

जय देव जय देव जय मंगलमूर्ती।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ॥धृ.॥
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती।
त्यांची सकलही पापे विघ्नेंही हरती।
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती।
सर्वहि पावती अंती भवसागर तरती॥ जय देव.।। 2 ।।

शरणांगत सर्वस्वें भजती तव चरणी।
कीर्ती तयांची राहे जोवर शशितरणि।
त्रैलोक्यी ते विजयी अदभूत हे करणी।
गोसावीनंदन रत नामस्मरणी।
जय देव जय देव.।। 3 ।।

गणपती आरती 3

आरती करु तुज मोरया।
मंगळगुणानिधी राजया॥ आरती॥धृ.॥
सिद्धीबुद्धीपती संकटनाशा।
विघ्ननिवारण तूं जगदीशा॥ आरती करुं.।। 1 ।।

धुंडीविनायक तू गजतुंडा।
सिंदूरचर्चित विलसित शुंडा॥ आरती करुं.।। 2 ।।

गोसावीनंदन तन्मय झाला।
देवा देखोनिया तुझ शरण आला॥
आरती करुं तुज मोरया.।। 3 ।।

महाराष्ट्रातील अष्टविनायकांची नावे आणि ठिकाणे यांची माहिती

श्रीगणेशाची प्रसिद्ध आठ मंदिरे महाराष्ट्रातील पुणे, रायगड आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांमध्ये वसलेली असून या आठ मंदिराच्या संचाला अष्टविनायक असे म्हटले जाते. मोठ्या संख्येने भविकगण या अष्टविनायक मंदिरांची तीर्थयात्रा करत असतात. आणि बाप्पाचे आर्शिवाद घेत असतात.

१) मोरेश्वर मंदिर, मोरगाव
२) सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक
३) बल्लाळेश्वर मंदिर, पाली
४) वरदविनायक मंदिर, महाड
५) चिंतामणी मंदिर, थेऊर
६) गिरिजात्मज मंदिर, लेण्याद्री
७) विघ्नहर मंदिर, ओझर
८) महागणपती मंदिर, रांजणगाव

गणपती बाप्पाकडून आचरणात आणा हे गुण, जीवन बनवा स्वर्गमय

आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाकडून आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो ज्यांमुळे अपल्ये जीवन आनंदी आणि सुखकर बनू शकते. गणपती हि बुद्धीची, कलेची, संकटांचं मोचन करणारी देवता आहे. गणेशाची विविध रूपे, आयुधे, नावे हे सर्व बऱ्याच गोष्टीची प्रातिनिधीक स्वरूपाची माहिती देतात. आपण गणेशाला पौराणिक गोष्टी, अध्यात्मिक संदर्भ याच रूपात शोधतो. पण जर लक्षपूर्वक बाकी गोष्टी हि जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास आपण या गणपती बाप्पा कडून इतरही गोष्टी शिकू शकतो.

कोणत्याही शुभ कार्याचा प्रारंभ आपण गणपती बाप्पाच्या नावाने आणि आशीर्वादाने करत असतो. गणपती हा प्रारंभाचे प्रतीक आहे. असे म्हणतात की योग्य गोष्टींची सुरुवात करताच आपण आपले जणू त्या क्षेत्रातील अर्धे युद्धच जिंकलेल असते . आजपासून आत्तापासून आपली इच्छित ध्येय गाठण्यासाठी गुंतवणूक सुरू करा. वैयक्तिक आर्थिक नियोजनाचा प्रारंभ करा. आजच तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रवासाचा आरंभ करा.

श्री गणेश हे ज्ञानाचे देव आहेत.

ज्या प्रमाणे गणपती हा विविध गोष्टी शिकून त्यात निपुण आहे त्याच प्रमाणे आपणसुद्धा वैयक्तिक आर्थिक नियोजन, विविध आर्थिक उत्पादने, त्यांची वैशिष्ट्ये, लाभ आणि नुकसान याबद्दल आवश्यक ते ज्ञान प्राप्त करून त्यात विशेष प्राविण्य मिळविण्यास कठोर मेहनत करा.

श्री गणेश हे बुद्धीची देवता आहे.

कुठलीही गुंतवणूक करत असताना आपण आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवणे आवश्यक असते निवडलेली गुंतवणुकीची साधने आपल्या बुद्धीशी घासून तपासून घ्या आणि मगच योग्य निर्णय घ्या. आपला लोभ नियंत्रणात ठेवा आणि गुंतवणूक संबंधित जोखमीचे मूल्यमापन केल्याशिवाय कधीही आंधळेपणाने परताव्याच्या मागे धावू नका.
गणेशा सामर्थ्याचे प्रतीक आहे. गणेशाने नेहमीच शारीरिक सामर्थ्यापेक्षा बौद्धिक सामर्थ्यावर संकटांवर मात केली आहे, बौद्धिक सामर्थ्यात मानसिक धैर्य आणि समतोलपणा ही ग्राह्य असते. दीर्घ मुदतीची गुंतवणूक करतांना शेअर बाजाराच्या चढउतारात आणि आर्थिक मंदीच्या कठीण काळात आपले डोके व मन शांत ठेवले पाहिजे. बाजारातील चढ उतारांना गरज नसल्यास घाबरून जाऊ नका आणि आपली दृष्टी दीर्घकाळात संपत्ती निर्माण करण्याचा प्रक्रियेवर लक्ष ठेवा.

गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत.

गणपती बाप्पा आपल्या जीवनातील अडथळे दूर करणारा आणि येणारी विघ्ने हरून घेणारा असतो. अशा या विघ्नहर्त्याचे स्मरण करून आपल्याला ही आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रवासात येणाऱ्या विविध संकटांना दूर करण्याचा प्रयत्न करणे लाभदायी ठरेल. गुंतवणुकीच्या मार्गात आर्थिक मंदी, रिटर्न दरातील घसरण, महागाई दरातील वाढ, नोकरी धंद्यातील चढउतार तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती अशा स्वरूपात विविध प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. अशा वेळेस तुम्हाला तुमच्या गुंतवणूकीच्या धोरणामध्ये आवश्यक ते बदल करा. अडचणींना सामोरे जाऊन त्या दूर कडून प्रगती करत रहा.

गणपती बाप्पा हे आत्मनियंत्रणाचे प्रतीक आहेत.

गणपती ही संतुलित विचारांची, सारासार विवेकबुद्धीची देयक असलेली योग्य मार्गदर्शन करणारी देवता आहे. आपण ही स्वतःच्या पैशाचा वापर करताना, आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करताना आपल्या भावनांवर नियंत्रण असणे महत्वाचे आहे. आपण स्वतः आपल्या आर्थिक निर्णयांची जबाबदारी घ्या. स्वतःच्या वित्त पुरवठ्यावर नियंत्रण ठेवा. आर्थिक सल्ल्यासाठी फक्त आपल्या मित्रांवर, कुटुंबातील सदस्यांवर किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर अवलंबून राहण्याची कधीच चूक करू नका. आर्थिक नियोजनाची आवड निर्माण करून ज्ञान प्राप्त करायला प्रारंभ करा.

गणपती हे कला आणि विज्ञानाचे संरक्षक आहेत.

वैयक्तिक वित्तसंचय ही एक कला तर आहेच तसेच विज्ञानही आहे. वैयक्तिक अर्थ(पैसा) हे गणितीय सांख्यिकी आणि सिद्धांतांवर अवलंबली आहे मात्र ते व्यक्तीनुसार बदलत जाते. वैयक्तिक अर्थव्यवस्थेची प्रगती ही त्या व्यक्तीच्या वर्तणूक अन् त्यांची विचारशैली तसेच त्यांच्यात असलेली शिस्तबद्धता यावर अवलंबून असते.

गणपती बाप्पा शुभ लाभचे मूलस्थान आहेत.

श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा करता क्षणीच घरातील वातावरण अगदी पवित्र आणि धार्मिक होते. गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबरच सगळीकडे प्रसन्नता पसरते. पवित्र गोष्टी तिथेच घडतात जेथे सर्वत्र श्रद्धा असते. तुमचा ही भविष्यकाळ सुखमय असेल यावर नेहमी विश्वास असायला पाहिजे. नकारत्मकतेपासून चार हात लांब रहा. बाजार, अर्थव्यवस्था किंवा जागतिक परिस्थितीबद्दल असलेल्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. दीर्घकालीन गुंतवणूकीवर विश्वास ठेवून आशावाद मनी बाळगा.

गणेश हे आनंदाची सुखमूर्ती आहेत.

लंबोदर राजाची मोहक मूर्ती किती प्रसन्नदायक असते. त्यांचे मुख सुख समाधानाचे द्योतक असते. आपण सुद्धा आपले रोजचे आयुष्य असेच सुखासमाधानाने आणि मजेत घालवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावर चालत असताना आपल्या वर्तमानचा भरपूर आनंद घ्या. रिकामा खर्च करण्याऐवजी योग्य ठिकाणी खर्च करून बचतीचा मार्ग अवलंबला तर ऐनवेळी अडचणींना सामोरे जावे लागत नाही. पैसे वाया घालवणे आणि पैसे खर्च करणे यातील फरक समजून घ्या.

श्रीगणेश हे सुखाचे, भरभराटीचे आणि शुभ कार्याचे देव आहेत.

गणपती बाप्पा सौभाग्याचे आणि भरभराटीचे प्रतीक आहे त्याचप्रमाणे आपले जीवन सुद्धा उत्कर्षाने आणि सुखाने भरभरून जावो अशी मनात श्रद्धा निर्माण करा. आर्थिक स्वातंत्र्य ही ऐशोआरमाची गोष्ट नसून ती आजच्या युगात एक निकड आहे. जेव्हा आपल्याकडे पुरेसे पैसे, संपत्ती असते तेव्हा आपण आपण पूर्णपणे जीवनाचा आनंद घ्यायला पात्र असता.

गणपती बाप्पाची १०८ नवे आणि त्यांचे अर्थ

  1. गणाध्यक्ष – सगळ्यांचं नेतृत्त्व करणार
  2. गणपती – सर्व गणांचा नेता
  3. गौरीसुत – माता गौरीचा पूत्र
  4. लंम्बोकर्ण – मोठे कान असलेला
  5. लंबोदर – मोठे पोट असलेला
  6. महाबल – अधिक बलशाली
  7. महागणपती – देवांचा देव
  8. महेश्वर – सर्व ब्रह्मांडचा देव
  9. मंगलमूर्ती – सर्व शुभकार्यांचा देव
  10. मूषकवाहन – ज्याचा सारथी उंदीर आहे.
  11. बालगणपती – बालक प्रिय असलेला
  12. भालचंद्रा – ज्याच्या मस्तकावर चंद्र आहे.
  13. बुद्धिनाथ – बुद्धीचा देव
  14. धूम्रवर्ण – धूरा सारखा रंग असलेला
  15. एकाक्षर – एकल अक्षर
  16. एकदन्त – एक दांत असलेला
  17. गजकर्ण – हत्तीप्रमाणे कान असलेला
  18. गजानन – हत्तीचं मुख असलेला देव
  19. गजवक्र – हत्तीची सूंड असलेला
  20. गजवक्त्र – हत्तीसारखं तोंड असलेला
  21. देवादेव – सर्वोत्तम
  22. देवांतकनाशकारी – वाईट आणि राक्षसांचा नाश करणारा
  23. देवव्रत – सर्वची तपश्चर्या स्वीकारतो
  24. देवेन्द्राशिक – सर्व देवांचं रक्षण करणारा.
  25. धार्मिक – दान देणारा
  26. दूर्जा – अजिंक्य देव
  27. द्वैमातुर – दोन माता असलेला
  28. एकदंष्ट्र – एक असलेला
  29. ईशानपुत्र – भगवान शिवशंकराचा पूत्र
  30. गदाधर – गदा शस्त्र असलेला
  31. अमित – अतुलनीय प्रभु
  32. अनन्तचिदरुपम – अनंत आणि व्यक्ति चेतना असलेला
  33. अवनीश – संपूर्ण जगाचा पालनहार
  34. अविघ्न – अडथळा दूर करणारा
  35. भीम – विशाल
  36. भूपति – पृथ्वीचा स्वामी
  37. भुवनपति – देवांचा देव
  38. बुद्धिप्रिय – बुध्दीचा देव
  39. बुद्धिविधाता – बुद्धीचा मालक
  40. चतुर्भुज – चार भुजा असलेला
  41. निदीश्वरम – धन आणि निधीचा दाता
  42. प्रथमेश्वर – सर्व देवांमध्ये प्रथम आराध्य
  43. शूपकर्ण – मोठे कान असलेला
  44. शुभम – सर्व शुभ कार्यांचा प्रभु
  45. सिद्धिदाता – इच्छा आणि संधीचा स्वामी
  46. सिद्दिविनायक – यश मिळवून देणारा
  47. सुरेश्वरम – देवांचा देव
  48. वक्रतुण्ड – वक्र सोंड असलेला
  49. अखूरथ – सारथी उंदीर आहे असा तो
  50. अलम्पता – अनन्त देव
  51. क्षिप्रा – आराधना योग्य
  52. मनोमय – हृदय जिंकून घेणारा
  53. मृत्युंजय – मृत्यूवर विजय मिळवणार
  54. मूढाकरम – ज्यामध्ये आनंद राहतो असा तो
  55. मुक्तिदायी – शाश्वत आनंद देणारा
  56. नादप्रतिष्ठित – जो नादब्रह्मला प्रतिष्ठित करतो असा
  57. नमस्थेतु – सर्व कष्ट दूर करणारा
  58. नंदन – भगवान शिव शंकराचं पूत्र
  59. सिद्धांथ – यश आणि यशस्वीतेचा गुरु
  60. पीताम्बर – पिवळे वस्त्र परिधान करणारा
  61. गणाध्यक्षिण – सर्व संस्थांचे नेते
  62. गुणिन – सर्व गुण संपन्न
  63. हरिद्र – सूवर्ण रंग असलेला
  64. हेरम्ब – आईचा प्रिय पूत्र
  65. कपिल – राखाडी रंग असलेला
  66. कवीश – कवींचा स्वामी
  67. कीर्ति – यशाचा स्वामी
  68. कृपाकर – कृपा करणारा
  69. कृष्णपिंगाश – पिवळी-राखाडी डोळे असलेला
  70. क्षेमंकरी – क्षमाशील
  71. वरदविनायक – यशाचा गुरू
  72. वीरगणपती – वीर प्रभु
  73. विद्यावारिधि – बुद्धीचा देव
  74. विघ्नहर – कष्ट दूर करणारा
  75. विघ्नहर्ता – विघ्न दूर करणारा
  76. विघ्नविनाशन – अडथळे दूर करणे
  77. विघ्नराज – सर्व अडथळ्यावर मात करणारा
  78. विघ्नराजेन्द्र – सर्व अडथळ्यांचा भगवान
  79. विघ्नविनाशाय – सर्व अडथळे दूर करणारा
  80. विघ्नेश्वर – सर्व विघ्न दूर करणारा.
  81. श्वेता – शुभ्र रंग असलेला
  82. सिद्धिप्रिय – इच्छापूर्ति करणारा
  83. स्कन्दपूर्वज – भगवान कार्तिकेयचा बंधू
  84. सुमुख – शुभ मुख असलेला
  85. स्वरूप – सौंदर्य प्रेमी
  86. तरुण – कोणतंही वय नसलेला
  87. उद्दण्ड – खोडकर
  88. उमापुत्र – पार्वतीचा पूत्र
  89. वरगणपती – संधींचा देव
  90. वरप्रद – इच्छा आणि संधीचा देव
  91. प्रमोद – आनंद
  92. पुरुष – अद्भुत व्यक्तिमत्व
  93. रक्त – लाल रंगाचं शरीर असलेला
  94. रुद्रप्रिय – भगवान शिवाचा आवडता
  95. सर्वदेवात्मन – सर्व देवांकडून सन्मान स्विकारणारा
    96) सर्वसिद्धांत – कौशल आणि बुद्धीचा दाता
  96. सर्वात्मन – ब्रह्मांडाचं रक्षण करणारा
  97. ओमकार – ओमचा आकार असलेला
  98. शशिवर्णम – चंद्राच्या रंगा सारखा
  99. शुभगुणकानन – सर्वगुण संपन्न
  100. योगाधिप – ध्यान करणारा परमेश्वर
  101. यशस्विन – लोकप्रिय देव
  102. यशस्कर – प्रसिद्धी आणि भाग्याचा स्वामी
  103. यज्ञकाय – सर्व यज्ञ स्वीकार करणारा
  104. विश्वराजा – संसाराचा देवता
  105. विकट – अत्यंत विशाल
  106. विनायक – सर्वांचा नायक
  107. विश्वमुख – ब्रह्मांडाचा गुरु
ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment