वर्तमानपत्रांत आपण बहुतेक वेळा गांजा शेती करणाऱ्या शेतकऱ्यास पडकुन गांजा जप्त अशा बातम्या वाचत असतो. गांजा पिकावर बंदी असताना सुद्धा बरेच शेतकरी भरघोस उत्पन्नाच्या हव्यासापोटी गांजा लागवड करण्याचे धैरिष्ट्य करतात. मात्र आज आपण गांजा शेती करण्याचे धोके आणि दुष्परिणाम काय आहात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. वेळोवेळी अनेक शेतकऱ्यांकडून गांजा लागवड अधिकृत करावी अशा मागण्या सरकारकडे केल्या जातात. मात्र परवानगी निषिद्ध असूनही बरेच शेतकरी छुप्या पद्धतीने गांजा लागवड करत असल्याच्या बातम्या अधून मधून प्रसारमाध्यमांत झळकत असतात. चला तर जाणून घेऊया गांजा शेती करण्याचे धोके आणि दुष्परिणाम काय आहेत.
कायदेशीर कार्यवाही, दंड आणि शिक्षा
तर मित्रांनो गांजा लागवड करण्याचे धोके आणि दुष्परिणाम यांमध्ये सर्वात भयंकर धोका आहे तो म्हणजे कायदेशीर कार्यवाहीचा बडगा. यासाठी एक NDPS कायदा असून
NDPS म्हणजे NARCOTIC DRUGS AND PSYCHOTROPIC SUBSTANCES ACT, 1985 असे या कायद्याच्या दंड संहितेचे नाव आहे.
या गांजा लागवड प्रतिबंधित करण्यासाठी लागू असलेल्या कायद्यातील तरतुदीनुसार अंमली पदार्थ आणि हेरॉइन, मॉर्फिन, गांजा, चरस, हॅशिश ऑइल, कोकेन, मेफेड्रोन, एलएसडी, केटामाइन, अॅम्फेटामाइन सारख्या मानवी मनावर शरीरावर दुष्परिणाम करणाऱ्या अंमली पदार्थाची निर्मिती, वाहतूक, बाळगणे, विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कार्यवाही करण्याची तरतूद आहे.
या गांजा लागवड प्रतिबंधित कायद्याच्या कलम 20 अनुसार गांजाची बेकायदेशीरपणे लागवड केल्यास 10 वर्षांपर्यंत सक्तमजुरी आणि 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक दंडाची शिक्षा किंवा दोन्हीही अशाप्रकारची जीवन उद्ध्वस्त करणारी शिक्षा होऊ शकते एवढे लक्षात घेणे आवश्यक आहे.
NDPS कायद्यानुसार, भारतात गांजाची लागवड निषिद्ध आहे. मात्र वेगवेगळ्या राज्यात त्यांच्या राज्य सरकारांना याप्रकरणी कायदे तयार करण्याची
परवानगी असल्यामुळेच राज्यातील काही शेतकरी गांजा लागवड अधिकृत करण्याची वेळोवेळी मागणी करतात.
गांजा लागवड केल्यास मानसिक अस्वस्थता निर्माण होते
शेतकरी मित्रांनो वर आपण गांजा पिकाच्या लागवडीच्या प्रतिबंधासाठी असलेल्या कायद्याची माहिती बघितली. गांजा लागवड करण्याचे धोके आणि दुष्परिणाम यामध्ये दुसरा सर्वात मोठा धोका हा गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मानसिक धोका असतो. लक्षात घ्या जो शेतकरी अवैध गांजाची लागवड करतो त्याला नेहमीच कायद्याची भीती लागून राहिलेली असते. आपली अवैध लागवड कोणी उघड करेल का आणि आपल्याला शिक्षा होईल का या भीतीनं त्याची सदैव बोबडी वळलेली असते. असे शेतकरी अप्रत्यक्षपणे सामाजिक अस्थिरता निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. अशा प्रकारचे अनैतिक कार्य करताना गांजा शेती करण्याचे धोके आणि दुष्परिणाम याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
गांजा शेती करण्याचे धोके आणि दुष्परिणाम समजून घेताना ही गोष्ट लक्षात घ्या की सरकार ज्या गोष्टींना प्रतिबंध करते अशा गोष्टी निश्चितच समाजाला आणि नागरिकांना धोका निर्माण करणाऱ्या असतात. मात्र काही शेतकरी अवैध गांजाची लागवड करण्याचे धोके आणि दुष्परिणाम लक्षात न घेता अवैध गांजाची लागवड करून स्वतः चे मानसिक स्वास्थ्य बिघडवून घेतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. असा पैसा, असे वैभव ज्यात मानसिक सुख नसते ते कवडीमोल ठरते. परिणामी 2 वेलची चटणी भाकर खावून आनंदाने आणि समाधानाने जगणारे शेतकरी सुद्धा या लोभी शेतकऱ्यांपेक्षा अधिक सुखी असतात.
युवा वर्गाचे जीवन उद्ध्वस्त होऊन सामाजिक अस्थिरता वाढण्यास कारणीभूत
आजच्या या तथाकथित आधुनिक युगात आजचा बहतांश तरुण सुद्धा भरकटलेला आहे हे नाकारून चालणार नाही. गांजाचे व्यसन लागलेले युवा त्यांचे जीवन उद्ध्वस्त करून त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी मनस्ताप ठरतात. गांजा लागवड करण्याचे धोके आणि दुष्परिणाम किती भयंकर आहेत याची कल्पना करण्यासाठी लक्षात घ्या जे शेतकरी जास्त पैशांच्या हव्यासापोटी गांजा लागवड करतात ते देशाचे भविष्य असलेल्या असंख्य तरुणाचे आयुष्य खिळखिळे करण्यास कारणीभूत ठरतात. त्यामूळे गांजा शेती करण्याचे धोके आणि दुष्परिणाम खूपच भयंकर आहेत असे निदर्शनास येते.
मुंबईत आजही शेती केल्या जाते का? जाणून घ्या रोचक माहिती
गांजा हा एक अंमली पदार्थ असल्यामुळे आजचा शहरी भागातील युवा त्याकडे लवकर आकर्षित होतो. गांजाची अवैध लागवड करणारे शेतकरी अशा कित्येक तरुणांना वाईट मार्गास लावणाऱ्या गांजाचा पुरवठा करून नैतिक दृष्ट्या अशा कुटुंबाचे अपराधी होतात. प्रत्येकाने नैतिकता सोडून केलेले कोणतेही कार्य हे त्याला मानसिक बेचैनी आणि भीती यांच्या स्वरूपात परत मिळतात. गांजा शेती करण्याचे धोके आणि दुष्परिणाम अशा प्रकारे एका हसत्या खेळत्या परिवाराला उद्ध्वस्त करू शकतात.
गांजा वनस्पती अंमली पदार्थांच्या श्रेणीत का येते?
गांजा शेती करण्याचे धोके आणि दुष्परिणाम आपण बघत आहोत त्याच बरोबर गांजा पीक अंमली पदार्थांच्या श्रेणीत का येते याची सुद्धा नहीती जाणून घेऊया. गांजा वनस्पतीत प्रमुख 2 घटक आढळून येतात, त्यापैकी एक घटक हा मानवी आरोग्याच्या दृष्टीने घातक आणि नशा आणणारे असतात. पहिला घटक म्हणजे टेट्राहायड्रोकॅनाबिनॉल (THC) आणि दुसरा घटक म्हणजे कॅनाबिडॉल (CBD). यापैकी टेट्राहायड्रोकॅनाबिनॉलमुळे गांजात नशा उत्पन्न करण्याची क्षमता विकसित होते. गांजा वनस्पतीमध्ये उच्च THC असतो परिणामी गांजा वनस्पती अंमली अंमली पदार्थांच्या श्रेणीत येते.
गांजाच्या या घटकाचा औषधी स्वरूपात वापर
गांजा शेती करण्याचे धोके आणि दुष्परिणाम आपण पाहिले.मात्र गांजाची औषधी गुणधर्म सुध्दा जाणून घेणे महत्वाचे आहे. यात आढळणाऱ्या कॅनाबिडॉल (CBD) घटकामध्ये नशा उत्पन्न करणारे घटक आढळून येत नाहीत. या घटकाचा उपयोग औषधी निर्मितीत सुद्धा होत असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्राला गांजा वनस्पतीत सापडणाऱ्या या रसायनाविषयी विशेष उत्सुकता आहे. या बिनविषारी घटकाचा उपयोग करून आरोग्य सेवा सुद्धा जनतेला प्रदान केल्या जातात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की गांजा वनस्पतीपासून जगभरात 25 हजारपेक्षा जास्त प्रॉडक्ट्स तयार केले जाऊन त्यांचा लोककल्याणासाठी वापर होतो हा भाग वेगळा.
शेतकरी का वळतात गांजा लागवडीकडे; भयाण वास्तव
विविध राज्यांतील राज्य सरकार शेतकरी हितार्थ सेवा पुरविण्याच्या, त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्याच्या बाबतीत बऱ्याच वेका अपयशी ठरल्यामुळे शेतकरी हा बहुधा हतबल दिसून येतो. शेतात राब राब राबून जगाचा पोशिंदा म्हणविल्या जाणाऱ्या या बळीराजाची दिवसेंदिवस तोट्यात चाललेली शेती तसेच डोक्यावर कर्जाचा अमाप बोजा या कारणांमुळे सुद्धा शेतकरी नाईलाजाने गांजा लागवड करण्यास प्रवृत्त होत असल्याची उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या काळात निसर्गाचे असमतोल होण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे हवामानाचा लहरीपणा वाढत आहे. परिणामी राज्यात कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडून शेतीत बहुधा नुकसानच दिसून येते. गांजा शेती करण्याचे धोके आणि दुष्परिणाम माहित असूनही मग बरेच शेतकरी ही हिंमत करतात.
काय आहेत विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या?, जाणून घ्या वास्तव
एखाद्या वर्षी शेतीत चांगले उत्पादन झालेच तर त्या वर्षी योग बाजारभाव मिळत नाही. अशा परिस्थितीत बळीराजा स्वतः चे कुटुंब कसे चालवणार? त्यांच्या गरजा कशा भागविणार? याचा सुद्धा विचार केल्या जाणे गरजेचे ठरते. सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवून शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कमालीचे प्रयत्न करताना दिसून येते. मात्र या प्रयत्नांत बऱ्याच त्रुटी सुद्धा असल्याचे नाकारता येत नाही कारण गरजू शेतकऱ्यांपर्यंत हे लाभ खरचं पोहोचतात का या विषयावर खर तर संशोधन करता येईल. ते काहीही असो, मात्र गांजा शेती करण्याचे धोके आणि दुष्परिणाम जाणून घेता अशा प्रकारची अवैध लागवड करणे हा काही योग्य आणि नैतिक तोडगा नाही हे मात्र तितकेच खरे.