बैलाने मालकाचा जीव वाचवला, मालकाचा उर दाटून आला

माया काय असते हे मुक्या प्रण्यांकडून शिकावे. त्यात बळीराजाचा आवडता असलेला बैल त्याचा मालकाप्रती अतिशय प्रामाणिक तसेच निष्ठावान असतो. बैलाच्या माया अन् प्रसंगावधान यांची साक्ष देणारी घटना मांगले गावात घडली. सौम्य अर्धांगवायूचा झटका आलेल्या आलेल्या आपल्या मालकाला खांद्यावर घेऊन तब्बल 4 किलोमीटर चालत घरी सुखरूप पोहोचवून या बैलाने मालकाचा जीव वाचवला आहे. या बैलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर अशी ही मनाला हेलावून टाकणारी अन् बैलाच्या प्रामाणिकतेची साक्ष देणारी घटना मांगले या गावात घडली. हा गावात एक्का नावाच्या बैलाने मालकाचा जीव वाचवला.

शेतात काम करत असताना आला अर्धांगवायूचा झटका

बैलाने मालकाचा जीव वाचवला मात्र यासाठी एक्का हा बैलाने नेमके काय केले हे जाणून घेऊया. संभाजी तडाखे हे शेतकरी त्यांच्या दोन बैलांना चारा आणण्यासाठी शेतात गेले. शेतात गेल्यानंतर त्यांनी दोन्ही बैलांना चरण्यासाठी मोकळे सोडले. आणि ते शेताच्या एका भागात चारा कापायला लागले. चारा कापून थोडा अवधी जात नाही इतक्यात त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांचा एक हात आणि एक पाय काम करत नव्हता. त्यांना हातापायात बधिरता जाणवू लागली.

बैलाने मालकाचा जीव वाचवला, मालकाचा उर दाटून आला

अशा परिस्थितीत त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. आजूबाजूला बघतात तर त्यांच्या आसपास सुद्धा कोणीच नव्हते. आता या जीवाचा घात करणाऱ्या बिकट परिस्थितीत शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी आपले सर्व बळ पणाला लावून जोरात त्यांच्या बैलांना हाक मारली. थोड्याच दूरवर सर्ज्या एक्क्याची जोडी चारा खात होती. त्यापैकी एक्का नावाच्या बैलाला मालकाची ही हाक ऐकू आली. मात्र ही हाक मालकाच्या नेहमीच्या हाकेप्रमाने नव्हती. त्यामुळे चारा खात असलेला एक्का नावाचा हा बैल थेट पळत सुटला अन् क्षणार्धात मालकापाशी येऊन थांबला.

एक्का बैलाने दाखवले प्रसंगावधान अन् केली कमाल

मालक जमिनीवर पडलेले पाहून त्याने जोरात हंबरडा फोडला. या6नंतर संभाजी तडाखे यांनी अथक प्रयत्नांनी एका हाताच्या आणि एका पायाच्या मदतीने उठून बैलाच्या खांद्यावर झोपले आणि त्यांनी एक्क्याला मला थेट घरी नेऊन सोड अशी विनंती केली. मूक जनावर असूनही मालकाचा आजचा व्यवहार हा काही नेहमीसारखा नाही याची कल्पना आलेल्या एक्का बैलाने मालकावर काहीतरी संकट आले आहे हे ओळखले. आणि मालकाला खांद्यावर घेऊन तो तसाच शेतातून घराकडे यायला निघाला. मात्र घर ते शेत हा तब्बल किमीचा प्रवास होता. संभाजी तडाखे यांच्या एक्का या बैलाने 4 किमी अंतर खांद्यावर असलेल्या मालकाला कुठलीही इजा न होऊ देता गाठले अन् एक्का बैल मालकाला घेऊन थेट घरी पोहोचला. अशाप्रकारे बैलाने मालकाचा जीव वाचवला.

बैलाने मालकाचा जीव वाचवला, मालकाचा उर दाटून आला

नाना पाटेकर यांचे शेती विषयक योगदान आणि शेतकरी म्हणून जीवन

संभाजी तडाखे यांच्यावर दवाखान्यात उपचार

घरी आल्या आल्या बैलाने हंबरडा फोडून कुटुंबातील इतर सदस्यांचे लक्ष त्याच्याकडे वेधले. घरातील सर्व मंडळी एक्क्याचा हंबरडा ऐकून धावत बाहेर आले तेव्हा त्यांना संभाजी तडाखे बैलाच्या खांद्यावर आढळून आले. मग कुटुंबीयांनी क्षणाचाही उशीर न करता संभाजी तडाखे यांना तात्काळ दवाखान्यात भरती करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. एक्का या बैलाने मालकाचा जीव वाचवला यामुळे तडाखे यांच्या कुटुंबाला एकक्याचे हे उपकार जीवनभर लक्षात राहतील.

बैलाने मालकाचा जीव वाचवला, सर्वत्र बैलाचे कौतुक

संभाजी तडाखे यांच्या बैलाने मालकाचा जीव वाचवला ही बातमी वाऱ्यासारखी गावात आणि परिसरात पोहोचली. बातमी माहीत पडल्यावर अनेक लोकांनी संभाजी तडाखे यांच्या घरी येऊन बैलाचे कौतुक केले. बैलाने मालकाचा जीव वाचवला ही घटना मुक्या प्राण्यांना सुद्धा भावना असतात आणि ही अबोल जनावरे इतकी प्रामाणिक तसेच मायाळू असतात की ते त्यांच्या मालकासाठी वेळप्रसंगी स्वतःच्या जीवाचा सुद्धा त्याग करायला मागेपुढे पाहत नाहीत याची प्रकर्षाने जाणीव होते.

शेणाच्या गोवऱ्या विकून महिन्याला तब्बल तीस हजार रुपये घरबसल्या कमवा

संभाजी तडाखे यांना मिळाले जीवनदान

बैलाने मालकाचा जीव वाचवला ही घटना ज्यांना ज्यांना कळली त्यांनी भरभरून या बैलाची स्तुती केली. कारण अर्धांगवायूचा झटका आलेल्या संभाजी तडाखे यांना दवाखान्यात आणायला जर उशीर झाला असता तर त्यांचा एक हात आणि एक पाय कायमचा निकामी झाला असता असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या एक्का नावाच्या बैलाने चार किलोमीटर चालत मालकाला घेऊन येऊन या बैलाने मालकाचा जीव वाचवला आणि यांना जीवनदान दिले असे म्हणायला हरकत नाही. याआधी सुद्धा आपण मुक्या जनावरांचे मानवाच्या जिवनात असलेले महत्त्व हे बैलाने मालकाचा जीव वाचवला या घटनेतून आपल्याला पाहायला मिळते. आणि या परोपकारी मुक्या प्राण्यांना जवळ करण्याचे प्रोत्साहन देते यात शंका नाही.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment