विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि आव्हाने

आपल्या राज्यातील एक मागास प्रदेश म्हणून ओळखला जाणारा प्रादेशिक विभाग म्हणजेच विदर्भ. आज विदर्भातील शेतकरी राज्यातील इतर भागातल्या शेतकऱ्यांइतका प्रगत नाही हे वास्तव नाकारता येत नाही. विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि आव्हाने मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. शेती करत असताना विदर्भातील शेतकऱ्यांच्या या समस्या कोणत्या आहेत याबद्दल आपण या लेखातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. राज्यातील तसेच देशातील बहुतांश शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने शेती करतात. यामध्ये पारंपरिक पद्धतीने शेती करण्याचे तोटे जाणवायला लागत असल्यामुळे आज आधुनिक शेती ही काळाची गरज बनली आहे.

मात्र आधुनिक शेती करण्यासाठी लागणारी साधने सुद्धा प्रत्येक शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या परवडतील असेही नाही. त्यात विदर्भातील बहुतांश शेतकरी हे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्यामुळे त्यांना शेती व्यवसायात अनेक आव्हानांचा सुद्धा सामना करावा लागतो. चला तर जाणून घेऊया विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि आव्हाने नेमकी कोणती आहेत याची सविस्तर माहिती.

आधुनिक शेती साधनांचा अभाव

विदर्भातील बहुतांश शेतकरी बांधव हे आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्यामुळे त्यांना नावीन्यपूर्ण शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त साधनांची गरज भासणार ही गोष्ट स्वाभाविक वाटत असली तरी त्यांची पोच मात्र या तंत्रज्ञानाच्या वापराची नाही हे वास्तव सुद्धा विसरून चालणार नाही. यावर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात हे खरे आहे. मात्र प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळतो हा विचार करण्यासारखा घटक आहे. आज शेतीतील तंत्रज्ञान सुद्धा उंच भरारी घेत आहे.

आधुनिक ड्रोन तसेच विविध स्वयंचलित यंत्रसामुग्री पासून ते दिवसागणिक प्रगत होत असलेली कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI टेक्नॉलॉजीचा वापर निश्चितच शेतकऱ्यांना शेती सुलभ आणि फायद्याची करण्यास उपयुक्त ठरत आहे याबद्दल शंका नाही. मात्र किती शेतकरी या नवीन यंत्रणांना आपलेसे करून शेतीत भरघोस उत्पादन घेण्यास आर्थिक तसेच मानसिक दृष्ट्या सक्षम आहेत याचे अवलोकन करणे सुद्धा आवश्यक आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांचा समस्या आणि आव्हाने

शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर

आजही विदर्भात असे अनेक शेतकरी पाहायला मिळतात ज्यांच्यावर कर्जाचा बोजा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आणि इतिहासात डोकावून पाहिले तर दिसून येणारा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा पहिला तर विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि आव्हाने यांची आपल्याला जवळून ओळख झाल्याशिवाय राहत नाही. सरासरी प्रत्येक तिसऱ्या शेतकऱ्यावर एकतर पारंपरिक सावकाराचे कर्ज आहे नाहीतर त्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा चढलेला आहे.

त्यात हवामानाच्या लहरीपणामुळे कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडून या भागातील शेतकऱ्यांची शेती नेहमी तोट्यात असते. अशा परिस्थितीतही जोमाने उभे राहून स्वतःच्या कुटुंबाचे पालपोषण करण्याची धमक या आहे. मात्र कर्जामुळे खंबीर शेतकरी सुद्धा मानसिक दृष्ट्या खचून जातो हे सुद्धा नाकारून चालणार नाही.

शेतीमालाला कवडीमोल बाजारभाव

विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि आव्हाने इतक्यावरच थांबत नाहीत. समजा एखाद्या वर्षी सर्व गोष्टी शेतीसाठी अनुकूल राहून शेतकऱ्याला अपेक्षित उत्पादन मिळालेच तर त्यावर्षी बाजारभाव मिळेल अन् खर्च तरी निघेल याची सुद्धा शाश्वती नाही. याच वर्षी बहुतांश शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकावर झालेला खर्च सुद्धा निघाला नाही अशी बिकट अवस्था आहे. आपण वर्तमान पत्रात नेहमी बातम्या वाचतो की अमुक अमुक शेतकऱ्याने त्याच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने रागाच्या भरात सर्व माल रस्तावर फेकून दिला.

पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळली गेलेली ही शेती अन् त्यातून निघालेले उत्पादन शेतकऱ्यांना योग्य बाजारभावाच्या अभावी फेकून देण्याची पाळी येऊन रिकाम्या हाताने आपल्या परिवारात परतणे यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नाही. विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि आव्हाने खूप आहेत. प्रत्येक आव्हानांना सामोरे जाऊन तरीही पुढील वर्षी सकारात्मक राहून शेती करणारा शेतकरी बांधव हा दरवर्षी एकतर हवामानाच्या अस्थरतेमुळे किंवा दलालांच्या शोषणामुळे पिळला जातो ही वस्तुस्थिती आहे.

पावसाची अनियमितता आणि अवर्षण

विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि आव्हाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला नैसर्गिक आव्हानांचा सुद्धा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. ग्लोबल वॉर्मिगच्या वाढत्या प्रभावामुळे याचा देशातील ऋतूचक्रावर अनिष्ट परिणाम दिसून येत आहे. याचेच फलित असे की मागील काही दशकांपासून पावसाळ्यात उचित पर्जन्यमान अनुकूल परिस्थिती आढळून येत नाही. दर वर्षी एक तर ओला किंवा कोरडा दुष्काळ हा शेतकऱ्यांच्या नशिबीच लिहिला गेलेला आहे की काय अशी अनुभूती येते.

एकूणच काय तर हवामानाची चंचलता ही विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि आव्हाने यांपैकी एक प्रमुख समस्या आहे. यावर मात करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवर पर्यावरणाचा समतोल राखणे अनिवार्य आहे. निश्चितच हे काही 1…2 दिवसांत होणारे काम नाही. यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होऊन उपाययोजना तसेच बचावात्मक कायदे तयार करण्याची जबाबदारी सरकारकडून उचलण्यात येणे आवश्यक आहे.

शेतीत ai technology चा वापर करून काय फायदा होतो जाणून घ्या

शेतकऱ्यांची पारंपरिक मानसिकता

विदर्भातील बहुतांश शेतकरी बांधव हे आजची पारंपरिक शेती करण्यात व्यस्त असून नावीन्यपूर्ण शेती करण्याकडे त्यांचा कल आजही दिसून येत नाही. चीन अमेरिका सारखी राष्ट्रे आज शेतीत अविस्मरणीय उन्नती करत आहेत ते साध्य झाले ते म्हणजे शेतीला आधुनिकतेची जोड दिल्याने. आधुनिक शेती करण्यासाठी लागणारी कौशल्ये आत्मसात करणे ही खरतर काळाची गरज आहे. शेतीला नवीन प्रयोगांच्या आधारे एक फायदेशीर व्यवसाय म्हणून अनेक राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी पायंडा पाडल्याचे अनेक उदाहरणे आपण वर्तमानपत्रातून वाचत असतो. मात्र विदर्भातील शेतकऱ्यांचा नावीन्यपूर्ण शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि आव्हाने तर अडथळा आहेतच मात्र हे सुद्धा खर आहे की साधनांचा अभाव आहे मात्र जे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सधन आहेत त्यांच्याकडे सुद्धा शेतीला आधुनिक तंत्रज्ञानची जोड देण्याची मानसिकता विदर्भात तरी दिसत नाही. परिणामी शेतीतून भरघोस उत्पादन घेण्याची संभाव्यताच पारंपरिक शेती पद्धतीतून संपुष्टात येते. त्यामुळे उच्च दर्जाच्या शेतीत अन् अनुकूल वातावरणात सुद्धा शेतकऱ्यांच्या नशिबी चांगले आर्थिक उत्पन्न बहुतांश वेळा येत नाही.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment