सांगली रोजगार महाकुंभ: ‘रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र’ या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सांगली जिल्ह्यात जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर एकूण १५ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील युवक-युवती, उद्योगांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.
सांगली रोजगार महाकुंभ: राज्यव्यापी उपक्रमाचा उद्देश
देशातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास व उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभर एकाच दिवशी एक हजार रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित होणार असून या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सांगली जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा आणि प्रत्येक उद्योग, कंपनी व आस्थापनाने रिक्त पदांची नोंदणी करून सक्रिय सहभाग घ्यावा, असे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी सांगितले.
रोजगार महाकुंभ 2026 विविध जिल्ह्यांची माहिती
अकोला
मुंबई
कोल्हापूर
धाराशिव
सांगली जिल्ह्यातील १५ मेळावे स्थळे
| अ. क्र. | स्थळ |
|---|---|
| १ | सांगली इंडस्ट्रियल स्कूल, प्रा. आय.टी.आय., सांगली |
| २ | राजारामबापू पाटील प्रायव्हेट आय.टी.आय., ईश्वरपूर |
| ३ | व्यंकटेश्वरा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पेठ |
| ४ | लोकनेते मा. हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टची आदर्श औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विटा |
| ५ | विश्वासराव नाईक कला, वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालय, शिराळा |
| ६ | श्री. राजशेखर रामराव पाटील महाविद्यालय, सावळज |
| ७ | पलुस शिक्षण प्रसारक मंडळ, पलूस |
| ८ | सिद्धार्थ पॉलिटेक्निक, जत |
| ९ | शिक्षण प्रसारक संस्था, कवठेमहांकाळ |
| १० | श्रीमती चंपाबाई बालचंद शहा महिला महाविद्यालय, सांगली |
| ११ | श्रीमती सुलोचना भट महिला इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, कुंडल |
| १२ | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमआयडीसी परिसर, कडेगाव |
| १३ | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आटपाडी |
| १४ | एम. जी. जाधव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भोसे |
| १५ | पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव |
सांगली रोजगार महाकुंभ: कोण सहभागी होऊ शकते?
Non-Matric, SSC, HSC, Graduate, Post Graduate, ITI, Diploma, BE तसेच विविध तांत्रिक व व्यावसायिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक युवक-युवती या मेळाव्यांमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. विविध उद्योग व आस्थापनांमध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त पदांसाठी उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत, निवड प्रक्रिया व पुढील नियुक्तीची कार्यवाही संबंधित आस्थापनांमार्फत करण्यात येणार आहे.
रोजगारपूर्व मोफत प्रशिक्षण
सांगली रोजगार महाकुंभ मध्ये सहभागी होणाऱ्या युवक-युवतींना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी आत्मविश्वासाने सामोरे जाता यावे यासाठी जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रोजगारपूर्व तयारीचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. यात CV/Resume तयार करणे, प्रभावी स्वपरिचय, मुलाखत कौशल्य, Mock Interview, व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य याबाबत मार्गदर्शन केले जाईल. हे प्रशिक्षण दि. ७ ते १० सप्टेंबर २०२६ तसेच दि. २१ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
सांगली रोजगार महाकुंभ 2026: संपर्क व आवाहन
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर, सांगली (दूरध्वनी : ०२३३-२९९०३८३) येथे संपर्क साधावा. जिल्ह्यातील युवक-युवती आणि उद्योगांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.
माहितीचा अधिकृत स्रोत: जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

मुख्य विश्लेषक (सरकारी योजना व कृषी क्षेत्र)
